नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

March 31, 2011 11:27 AM0 commentsViews: 72

31 मार्च

नाशिक मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवरुन मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये महापौर निवसासमोरच हाणामारी झाली. मनसेच्या नगरसेवक शिला भागवत यांना शिवसेनेनं पळवून नेल्याची तक्रार मनसे कार्यकर्त्यांनी केली होती. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते बडगुजर यांच्या घरी जाऊन त्यांना जबर मारहाण झाली. दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक शिला भागवत यांना पुन्हा आपल्या ताब्यात घेतलं आहे. आणि बडगुजर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान, निवडणुकीचा निकाल 5 तारखेला कोर्टासमोरच उघडणार आहे.

close