बांद्रा सरकारी कॉलनीत जागा नसल्यास इतरत्र जागा देऊ – भुजबळ

March 31, 2011 11:59 AM0 commentsViews: 5

31 मार्च

मुंबईतील बांद्रा सरकारी कॉलनीतील रहिवाशांनी जर गृहनिर्माण संंस्था स्थापन करुन जागा मागितली तर सरकार विचार करेल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. बांद्रा सरकारी कॉलनीत जर जागा असेल तर तिथे अन्यथा मुंबईत इतरत्र जागा देण्याचा विचार करु असंही ते म्हणाले. या कॉलनीतील एकूण 187 इमारती पैकी 110 इमारतीची दुरुस्ती केली गेली असून उरलेल्या दुरुस्तीसाठी 11 कोटी मंजूर केल्याची माहिती विधानसभेत भुजबळांनी दिली. बीओटी तत्वावर गव्हर्नमेंट कॉलनी पूर्नबांधणीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

close