पोलिसांच्या बदली कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव मांडणार – आर आर पाटील

March 31, 2011 12:03 PM0 commentsViews: 1

31 मार्च

राज्यात पोलीस अधिकार्‍यांच्या तीन वर्षांच्या आत बदल्या करता येणार नाहीत. याबाबतच्या कायद्यात बदल करण्यासंदर्भात गृहविभागातर्फे मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवला जाईल अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत दिली. बदलीच्या कायद्याचा गैरवापर काही अधिकारी करतात. ही बाब शासनाच्या लक्षात आली असून कायद्यात बदलाची गरज असल्याचं आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केलंय.

मॅटचाही काही प्रमाणात गैरवापर होतोय. त्याबाबतही सरकारने आठ दिवसाच्या आत काय उपाययोजना करणार याची माहिती सादर करावी असे आदेश अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिले. तर माहितीच्या अधिकाराचा काही ठिकाणी गैरवापर होतोय. पण हा केंद्राचा कायदा असल्याने या कायद्यात राज्य सरकारतर्फे काही सुधारणा केल्या जाऊ शकतात का जेणेकरुन या कायद्याचा चांगल्या गोष्टीसाठी वापर होईल याबाबतची भूमिका राज्य शासनाने येत्या आठ दिवसात सभागृहात स्पष्ट करावी असेही निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत.

close