बलवाच्या विमानातून कृषीमंत्र्यांचा प्रवास !

March 31, 2011 12:24 PM0 commentsViews: 2

31 मार्च

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील मुख्य आरोपी शाहीद बलवा यांच्या खाजगी विमानातून शरद पवार यांनी दुबईपर्यंत प्रवास केला होता. या विमानात पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, बीसीसीआचे अध्यक्ष शशांक मनोहर, आणि विनोद गोयंका हेसुद्धा होते, असं एकनाथ खडसेंनी विधानसभेत सांगितलं आणि एकच खळबळ उडाली.

यापैकी विनोद गोएंका यांच्या भावाचे दाऊदशी संबंध आहेत आणि पवारांनी त्यांच्यासोबत प्रवास केला कसा असा सवाल खडसेंनी विचारला. तसेच शाहीद बलवा यांच्या खाजगी विमानाचा वापर प्रफुल्ल पटेल, दिलीप देशमुख, जयंत पाटील तसेच जयंत शहा यांनीही केला अशी माहिती खडसेंनी दिली. हिरेव्यापारी भरत शहावर मोका लावण्याची कारवाई केली.

आता शाहीद बलवावरही तशाच प्रकारची कारवाई सरकार करणार का असा सवालही खडसे यांनी विचारला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहे. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनीसुद्धा बलवांचे विमान वापरल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला आहे. 21 ऑगस्ट 2010 आणि 7 सप्टेंबर 2010 या दोन दिवशी भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांनी बलवाच्या विमानातून प्रवास केल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. भाजपने हे मात्र आरोप नाकारले आहे.

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे नुसते आरोप करून थांबलेले नाहीत तर त्यांनी शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही शाहीद बलवांच्या इऑन एव्हिएशनच्या विमानाने कधी प्रवास केला..या तारखांचे पुरावेच त्यांनी दिलेत.

बलवांचं विमान दिमतीला !

8 फेब्रुवारी 2010 – दुबई प्रवास

शरद पवार, प्रतिभा पवार, शाहीद बलवा, आय. एस. बिंद्रा, शशांक मनोहर, वर्षा मनोहर, हरून लोगार्ट, विनोद गोएंका

10 एप्रिल 2010- बंगळुरू प्रवास

प्रफुल्ल पटेल, शाहीद बलवा, विनोद गोएंका

12 एप्रिल 2010 दिल्ली प्रवास

प्रफुल्ल पटेल आणि इतर

14 एप्रिल 2010 – गोंदिया प्रवास

प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल

8 मे 2010 दिल्ली प्रवास

प्रफुल्ल पटेल आणि इतर

16 मे 2010 जयपूर प्रवास

शरद पवार आणि इतर

7 जानेवारी 2010 दिल्ली प्रवास

जयंत पाटील आणि अन्य

7 जानेवारी 2010 नांदेड प्रवास

जयंत शहा आणि अन्य

15 जानेवारी 2010 तिरुपती प्रवास

प्रफुल्ल पटेल

20 जानेवारी 2010 दिल्ली प्रवास

प्रफुल्ल पटेल

1 फेब्रुवारी 2010 नागपूर प्रवास

प्रफुल्ल पटेल, दिलीप देशमुख

5 फेब्रुवारी 2010 दिल्ली प्रवास

प्रफुल्ल पटेल

जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड यांनीही भाजप नेत्यांच्या प्रवासाच्या तारखा सादर केल्या आहे. 21 ऑगस्ट 2010 ला नितीन गडकरी यांनी पियुष गोयल यांच्यासोबत प्रवास केला आहे. शिवाय त्यांच्यासोबत भाजपचे महत्त्वाचे नेते होते. 7 सप्टेंबर 2010 – भाजपचे माजी अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि सत्यकुमार यांनी मुंबई ते विशाखापट्टणम असा प्रवास केला.

कोण आहे शाहीद बलवा ?

- डी. बी. रिऍल्टीजचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि स्वॉन टेलेकॉमचा व्हाईस चेअरमन – स्वॉन टेलिकॉम 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातली मोठी लाभार्थी कंपनी – बलवा 2 जी घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक, सध्या तुरुंगात – अनेक राजकीय नेत्यांशी संबंध, ए. राजांशी जवळीक – 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातला पैसा रिअल इस्टेटमध्ये वळवल्याचा संशय – शाहीद बलवाचे दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याचा संशय – दाऊदशी संबंध असलेल्या विनोद गोयंकाशी घरोब्याचे आणि व्यावसायिक संबंध – अनिल अंबानींच्या रिलायन्स टेलिकॉमची बलवाच्या कंपनीत गुंतवणूक – वयाच्या 36 व्या वर्षी, भारतातला 50 वा सगळ्यात श्रीमंत माणूस

close