पुण्यातील रुबी हॉस्पिटलची चौकशी होणार !

March 31, 2011 12:45 PM0 commentsViews: 3

31 मार्च

चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंदणी होऊनही हॉस्पिटल नियम पाळत नसल्याची तक्रार आज विधान परिषदेत करण्यात आली. त्यामुळे पुण्यातील रुबी हॉस्पिटलची चौकशी करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी दिली. तसेच यापुढे रुबी सारख्या सर्व खाजगी हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी किती बेड्स आहेत याची माहिती ऑनलाईन ठेवण्याची सक्ती केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. चॅरिटेबल ट्रस्ट खाली नोंदणी होऊनही अनेक हॉस्पिटल नियम पाळत नसल्याची तक्रार राज्यभरातून होत आहे.

close