कलम 377 संदर्भात अंबुमणी रामदॉस पंतप्रधानांची भेट घेणार

November 8, 2008 1:19 PM0 commentsViews: 19

08 नोव्हेंबर मुंबई , केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदॉस मुंबईत जे. जे. हॉस्पिटलच्या एका विभागाचंउदघाटनकरण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी होमोसेक्शुअ‍ॅलिटीबद्दल केंद्राची भूमिका स्पष्ट केली. कलम 377 अंतर्गत होमोसेक्शुअ‍ॅलिटी हा गुन्हा मानण्यात आला आहे. यामध्ये सुधारणा करून होमोसेक्शुअ‍ॅलिटीला दिलेलं गुन्हेगारी स्वरूप रद्द करावं, या मागणीसाठी आता ते पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या आधी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार रामदॉस आणि गृहमंत्री यांची दिल्लीत बैठक झाली. पण या बैठकीत यावर तोडगा निघाला नाही. गृहमंत्र्यांनी कलम 377 मध्ये सुधारणा करण्यास विरोध केला आहे.

close