शेतीसाठी रात्री सलग 10 तास वीज पुरवठ्याची घोषणा

March 31, 2011 1:18 PM0 commentsViews: 164

31 मार्च

राज्यात भारनियमनचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागाला बसतो. परिणामी शेतकर्‍यांना मोजकीचं वीज वापरता येत असते. मात्र आता शेतीसाठी रात्री सलग 10 तास वीज पुरवठा करण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री आणि उर्जामंत्री अजित पवार यांनी केली. उद्या शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. रात्री अकरापासून सलग दहा तास हा वीज पुरवठा सुरू राहणार आहे.

close