भारताची लोकसंख्या 1 अब्ज 21 कोटी ;ठाण्यात सर्वाधिक लोकसंख्या

March 31, 2011 1:30 PM0 commentsViews: 322

31 मार्च

भारत आता अब्जावधींचा देश म्हणून ओळखला जातोय. याचं कारण म्हणजे भारताची लोकसंख्या आता 1 अब्ज 21 कोटी झाली आहे. 2011 च्या जनगणनेतून ही गोष्ट पुढे आली आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लोकसंख्या वाढीचा दर घसरला. जम्मू काश्मीर, बिहार आणि गुजरातमधील स्त्री-पुरुषांच्या प्रमाणामध्ये घट झाली. तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांची लोकसंख्या अमेरिकेएवढी आहे. ठाणे देशातील सर्वाधिक जास्त लोकसंख्येचा जिल्हा असल्याचा निष्कर्ष या जनगणनेत काढण्यात आला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण पुरूषांपेक्षाही जास्त असल्याचं स्पष्ट झालंय.

close