टीम इंडिया मुंबईत दाखल

March 31, 2011 2:35 PM0 commentsViews: 1

31 मार्च

मुंबईच्या वानखेडे मैदानावर येत्या 2 एप्रिलला वर्ल्ड कपची मेगाफायनल रंगणार आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन बलाढ्य संघ आमने सामने येणार आहे. या मेगाफायनलसाठी आज भारतीय टीम मुंबईत दाखल झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेत भारतीय टीमचं आज संध्याकाळी मुंबईत आगमन झालं. भारतानं सेमीफायनलमध्ये पाकिस्तान पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. तर श्रीलंकेची टीम कालच मुंबईत दाखल झाली आहे. आणि आज लंकेच्या टीमने वानखेडे मैदानावर सरावही केला. श्रीलंकेनं सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता. शनिवारी होणार्‍या या मेगाफायनलची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

close