औरंगाबादमध्ये चौथीच्या विद्यार्थीनीवर शिक्षकाचा वर्गातच बलात्कार

April 1, 2011 9:29 AM0 commentsViews: 82

01 एप्रिल

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका शिक्षकानेच्या चौथीत शिकणार्‍या मुलीवर वर्गातच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. दावरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला. प्रमोद गायकवाड असं या नराधम शिक्षकाचं नावं आहे. या प्रकरणी गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. शाळा सुटल्यानंतर संबंधित मुलीला प्रमोद गायकवाडनं वर्गातच थांबवून घेतलं. तसेच वर्गाच्या दारं-खिडक्या बंद करुन या छोट्या मुलीवर बलत्कार केला.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगी मदतीसाठी आरडाओरडा करत असताना शाळेतील कोणीही तिच्या मदतीला गेलं नाही. या वर्गासमोरच उभा असलेला शाळेचा शिपाईसुद्धा या मुलीच्या मदतीसाठी गेला नाही. या घटनेनंतर गावकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली.

गावकर्‍यानी शाळा बंद करून शाळेतच ठिय्या मांडला. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. नराधम प्रमोद गायकवाडला तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात इतर तिघांना निलंबित करण्यातआलं आहे.

close