वानखेडे स्टेडियमच्या परिसरात नो फ्लाईंग झोन घोषित

March 31, 2011 5:26 PM0 commentsViews: 2

31 मार्च

भारत आणि श्रीलंकाच्या वर्ल्ड कप मॅचवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्यानं कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. वानखेडे स्टेडियमच्या परिसरात नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. केंद्राच्या परवानगीनंतर मुंबई पोलिसांचा हा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ही घोषणा केली आहे. आजगुरूवारपासून दोन एप्रिलपर्यंत हा नो फ्लाईंग झोन असेल. तसेच बल्क एसमएसवरही 2 एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

close