फायनल मॅचसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियावर बंदी

April 1, 2011 10:12 AM0 commentsViews: 3

1 एप्रिल

भारत – श्रीलंका दरम्यानची फायनल मॅच उद्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही टीमचा सराव, पत्रकार परिषद वर्ल्ड कप ट्रॉफीबरोबरचे टीमचे फोटो असा भरगच्च कार्यक्रम आज सकाळपासून आहे. पण आयसीसीने या कार्यक्रमासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियावर चक्क बंदी घातली आहे. न्यूज चॅनलचे रिपोर्टर आणि कॅमेरामन यांचं ऍक्रिडिटेशनच काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळे कप्तान धोणीच्या पत्रकार परिषदेसाठी रिपोर्टरना जाता आलेलं नाही. आयसीसी आणि न्यूज चॅनलमधील भांडण जुनंच आहे. सेमी फायनलमध्येही मीडियाला असा त्रास झाला होता. पण यावेळी सरकारने हस्तक्षेप केल्यानंतरही मीडियाला स्टेडियममध्ये सोडण्यात आलेलं नाही.

close