वर्ल्ड कप नंतर बॉलिवूडची इंनिग

March 31, 2011 5:51 PM0 commentsViews: 2

31 मार्च

शनिवारी वर्ल्ड फायनल मॅच झाल्यावर सेलिब्रेशन करण्यासाठी यावेळी सिनेमांचे चांगले ऑप्शन्स आहेत. बर्‍याच दिवसांनी बॉलिवूडचे सिनेमे रिलीज होत आहे. बरेच दिवस चर्चा असलेला गेम सिनेमा रिलीज होतोय. अभिषेक बच्चन, कंगना राणावत, सारा जेन, बोमन इराणी अशी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आहे सायको थ्रिलर. एका बेटावर कबिर मल्होत्राच्या आमंत्रणावरून चार अनोळखी एकत्र येतात आणि सुरू होतो एक नवा गेम.या सिनेमाचं दिग्दर्शन अभिनय देवनं केलयं. अभिनयचा हा पहिला हिंदी सिनेमा हा गेम प्रेक्षकांना किती इंटरेस्टिंग वाटतो, ते लवकरच कळेल.

सध्या सगळ्यांचा मूड आहे सुट्टीचा, टाइमपासचा अशा वेळी फालतू सिनेमाचा एक ऑप्शन आहे. या कॉमेडकोरिओग्राफर रेमो डिस्झुझाचंही पहिलं दिग्दर्शन आहे. जॅकी भगनानीचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला होता. आता या दुसर्‍या सिनेमात तो किती यशस्वी ठरतोय ते पाहायचं. तसेच रितेश देशमुख, पूजा गुप्ता, अर्शद वारसी यांचीही धमाल या सिनेमात पाहता येईल.

या आठवड्यात मराठी सिनेमाही पाहता येईल तो म्हणजे 'सद्‌रक्षणाय'. या सिनेमात मानसी साळवी पोलिसाच्या भूमिकेत आहे. तर तिच्यासोबत तुषार कपूर आहे. मानसीनं काही स्टंट सिनही केले आहेत. घर आणि काम यातली स्त्रीची कुतरओढ सिनेमात दाखवली गेली आहे. त्यामुळे फायनल मॅच पाहिली की मग थिएटरकडे वळायला हरकत नाही.

close