ईशांत नकवीने ज्युनिअर बॅडमिंटन विजेतेपद पटकावलं

November 8, 2008 3:43 PM0 commentsViews: 96

08 नोव्हेंबर ठाणे , ठाणे महापौर चषक ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत एकोणीस वर्षांखालच्या गटात अपेक्षेप्रमाणेच ठाण्याच्या ईशांत नकवीने विजेतेपद पटकावलं. पुरुषांच्या डबल्समध्येही ईशांतने विशाल दासच्या साथीने स्पर्धा जिंकली. मुलींच्या गटात मात्र टॉप सिडेड प्राजक्ता सावंतला पराभव पत्करावा लागला. दुसरी सिडेड पुण्याची संयोगिता घोरपडेने विजेतेपद पटकावलं. ठाणे शहर आणि जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढच्याच महिन्यात पाटण्यात ज्युनिअर आणि सब ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राची टीम या स्पर्धेतल्या कामगिरीवरून निवडण्यात येणार आहे. यंदा या स्पर्धेला विक्रमी प्रतिसाद मिळाला. 19 जिल्ह्यातले आठशेच्यावर बॅडमिंटनपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.

close