महात्मा गांधी यांच्यावरील पुस्तकावर बंदी घालू नये – तुषार गांधी

April 1, 2011 10:42 AM0 commentsViews: 4

1 एप्रिल

महात्मा गांधी यांच्या जीवनावरील वादग्रस्त `ग्रेट सोल` महात्मा गांधी ऍण्ड हिज स्ट्रगल विथ इंडिया' या पुस्तकावर बंदी घालू नये असं मत गांधीजींचे नातू तुषार गांधी यांनी व्यक्त केलं आहे. कुणाच्या वाईट लिहिण्यानं गांधींजींचं मोठेपण कमी होणार नाही असं तुषार गांधी म्हणाले. पुस्तक वाचूनच त्याबाबतचा निर्णय घ्यावा असं ते म्हणाले.

ग्रेट सोल 'महात्मा गांधी ऍण्ड हिज स्ट्रगल विथ इंडिया' असं या पुस्तकाचं नाव आहे. न्यूयॉर्क टाईम्सचे माजी संपादक आणि पुलित्झर पुरस्कार विजेते लेखक जोसेफ लेल्वेड या पुस्तकाचे लेखक आहेत. महात्मा गांधींचे कालेनबाक या जर्मन व्यक्तीशी प्रेमसंबंध होते असा उल्लेख या पुस्तकात आहे. गुजरात सरकारने या पुस्तकावर बंदी घातली. तर महाराष्ट्र सरकारने बंदी घालण्याचा इशारा दिला.

close