हातावर तुरी देऊन बिबट्या पळला

April 1, 2011 11:01 AM0 commentsViews: 65

1 एप्रिल

जुन्नर तालुक्यातील धोलवड इथं जेरबंद केलेला बिबट्या पळून गेला. हा बिबट्या काल दत्तात्रय नलावडे यांच्या शेतातील विहिरीत पडला होता. जुन्नर वनविभागाचे अधिकारी, स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीनं त्याच्याभोवती काट्याचं कुंपण घालण्यात आलं. त्यानंतर विहिरीत शिडी सोडण्यात आली. काल दिवसभर बिबट्या विहिरीत होता. वीस तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. पण पिंजर्‍याचे गज खराब असल्यानं त्यातून बिबट्यानं पलायन केलं.

close