पुण्यातील एनसीएलची जमीन बिल्डराच्या घशात घातली – फडणवीस

April 1, 2011 1:49 PM0 commentsViews:

01 मार्च

पुण्यातील पाषाण जमीन घोटाळ्याबद्दल भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची 90 हजार चौरस फूट जमीन खाजगी बिल्डर कन्हैयालाल बल्दोटांच्या घशात घालण्यात आली असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. युएलसीची बनावट कागदपत्र तयार करून हा गैरव्यवहार करण्यात आला असा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर हा गैरव्यवहार लपवण्यासाठी गेल्या वर्षी नगरविकास खात्याने एक आदेश काढला असंही फडणवीस यांनी लक्षात आणून दिलं.

close