सायमन कॅटीचची दमदार सेंच्युरी

November 8, 2008 3:36 PM0 commentsViews: 5

08 नोव्हेंबर नागपूर,ऑस्ट्रेलियाच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरली ती सायमन कॅटीचची सेंच्युरी. सायमन कॅटीचनं दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी ठोकली. या आधी कॅटीचला राहुल द्रविडकडून जीवदानही मिळालं. इशांत शर्माच्या बॉलिंगवर कॅटीचचा कॅच उडाला पण राहुल द्रविडला मात्र तो पकडता आला नाही. कॅटीचनं या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत पाचवी सेंच्युरी पूर्ण केली. त्याने केलेल्या 102 रन्समध्ये 9 फोरचा समावेश होता. करिअरमधली त्याची ही पाचवी तर भारताविरुद्धची ही दुसरी टेस्ट सेंच्युरी ठरली आहे.

close