महासंग्रामासाठी सज्ज

April 1, 2011 4:59 PM0 commentsViews: 6

01 एप्रिल

महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता ही टीम 1983 वर्ल्ड कप विजयाची पुनरावृत्ती करणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. भारतीय टीमचा सध्याचा फॉर्म पाहिला तर वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमचं प्रबळ दावेदार आहे. फायनल भारतानंच जिंकावी असं सगळ्यांना वाटतंय. भारतीय टीमची या वर्ल्ड कपमधली कामगिरी सातत्यपूर्ण आहे. आणि म्हणूनच क्रिकेट फॅन्सच्याही अपेक्षा वाढल्या आहेत.

25 जून 1983. कपिल देवच्या टीमने भारतातही कोणाला जे शक्य वाटत नव्हतं ते करुन दाखवलं. वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य टीमला हरवत भारताने वर्ल्ड कप पटकावला. 28 वर्षांनंतर करोडो भारतीय क्रिकेट प्रेमींचं तेच स्वप्न आता पुन्हा जागं झालं आहे.

महेंद्रसिंग धोणी आणि टीमची खरी सत्त्वपरीक्षा आता सुरु होणार आहे. मागच्या काही वर्षात टीमने फार कमी गमावलंय. आणि बरंच काही कमावलंय.

त्यामुळे क्रिकेटमधील अव्वल टीममध्ये आपली गणना होतेय. भारतीय टीमची खरी ताकद अर्थातच बॅटिंगमध्ये आहे. आपला सहावी वर्ल्ड कप स्पर्धा खेळणार्‍या सचिन तेंडुलकरने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक रन्स केलेत. तब्बल दोन सेंच्युरी त्याच्या नावावर आहेत. सेहवाग, आणि युवराजही चांगले फॉर्मात आहे. आणि श्रीलंका टीमला खरा धोका या दोघांपासूनच आहे. तर विराट कोहली, सुरेश रैना आणि युसुफ पठाण या युवा खेळाडूंची कामगिरीही सातत्यपूर्ण होतेय.

दुसरीकडे बॉलर्सचाही आता बर्‍यापैकी जम बसला आहे. झहीर, हरभजन, नेहरा आणि मुनाफ पटेल यांना जर एकत्रपणे लय सापडली तर मॅच होतं हे पाकिस्तानविरुध्दच्या सेमीफायनल मॅचमध्ये दिसून आलंय.

यापूर्वी दोनदा भारतात वर्ल्ड कप स्पर्धा झाली. आणि दोनही वेळा भारतीय टीमने सेमी फायनल गाठली. पण यावेळी भारताने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. आणि यावेळी भारतीय टीम एक पाऊल पुढे टाकत वर्ल्ड कप पटकावते का हे आता बघायचंय.

close