राष्ट्रपतींच्या हस्ते विजय केळकर यांना पद्मविभूषण प्रदान

April 1, 2011 5:45 PM0 commentsViews: 4

01 एप्रिल

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांना आज शुक्रवारी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पद्मविभूषण देऊन सन्मानित केलं. राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात अभिनेते शशी कपूर, अभिनेत्री काजोल, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया, उद्योगपती असीम प्रेमजी, नाट्यकर्मी सत्यदेव दूबे, आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर, वार्ली चित्रकार जिव्या सोमा म्हसे, शूटर गगन नारंग अशा एकूण 66 जणांचा गौरव यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. पद्म वितरणाचा आज दुसरा टप्पा झाला. पहिला टप्पा गेल्या आठवड्यात पार पडला होता.

close