पेण अर्बन बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकरला अटक

April 1, 2011 6:15 PM0 commentsViews: 65

01 एप्रिल

पेण अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी आणि चेअरमन शिशिर धारकर याला मुंबईतून अटक करण्यात आली. धारकरवर पेण अर्बन बँकेचे 599 कोटींच्या अफरातफरीचा आरोप आहे. या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच बँकेच्या 14 संचालकांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यात 49 संचालक आणि प्रशासकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सर्व संचालक फरार झाले होते. त्यांच्यावर खोटे दस्तावेज तयार करणं आणि कागदपत्राच्या पूर्ततेशिवाय कर्ज देण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

close