श्रीलंकेची बॅटिंग ; श्रीसंतला संधी

April 2, 2011 8:44 AM0 commentsViews: 3

02 एप्रिल

भारत आणि श्रीलंका टीममध्ये होणार्‍या वर्ल्ड कप फायनलमध्ये निर्णायक 'टॉस का बॉस' साठी लंकन टीम बॉस ठरली आहे. टॉसच्या वेळी एक गंमत घडली. भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने टॉससाठी नाणं उडवलं. पण फॅन्सच्या प्रचंड आवाजामुळे संगकारा हेड्स म्हणाला की टेल्स हे धोणीला ऐकूच गेलं नाही. त्यामुळे टॉस नक्की कोणी जिंकला हे दोनेही कॅप्टनना कळेना. दोघं एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. अखेर मॅच रेफरी जेफ क्रो यांनी टॉस पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. आणि यावेळी मात्र संगकाराने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. वानखेडे स्टेडि/म अर्थातच हाऊसफुल झालंय. त्यामुळे प्रेक्षकांचा जल्लोष मैदानावर पाहायला मिळतोय.

टीम इंडियामध्ये आशिष नेहरा दुखापत झाल्यामुळे तो या फायनलसाठी मुकणार आहे त्याजागी श्रीसंतला संधी मिळाली आहे. तर लंकनं टीममध्ये मॅथ्यूज ही खेळणार नाही.

close