भारत जिंकल्यास ‘एका बिर्याणीवर एक बिर्याण फ्री !’

April 2, 2011 9:59 AM0 commentsViews: 98

02 एप्रिल

पुणं तिथं काय उणं…पुणेकरांची भन्नाट कल्पना भारत-पाक सेमीफायनलच्या वेळी 'एका मिसळवर एक मिसळ फ्री' अशी शक्कल पाह्याला मिळली. आता पुणेकरांनी त्यापुढंच पाऊल टाकलं आहे आणि आता तर एका बिर्याणीवर बिर्याणी फ्री मिळणार आहे. पुण्यातील कर्वेनगर भागातील ताथवडे उद्यान परिसरातील पोटभर नॉनव्हेज या नवीनच सुरू झालेल्या हॉटेलनं ही योजना जाहीर केली आहे. भारतानं लंकेविरूध्दच्या सामन्यात बाजी मारली तर आगाऊ नावनोंदणी करणार्‍या खवय्यांकरता एका बिर्याणीवर एक बिर्याणी फ्री अशी योजना जाहीर केली आहे. मॅच जिंकली तर पहिल्या 100 जणांना रविवारी चिकन किंवा मटन दम बिर्याणी मिळणार आहे. उरलेल्या खवय्यांना गुढी पाडव्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी पार्सलमधे बिर्याणी मिळणार आहे.

close