पुन्हा एकदा मिसळवर मिसळ फ्री !

April 2, 2011 10:12 AM0 commentsViews: 16

02 एप्रिल

पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या…यातील एका पाटीनं भारत-पाक सेमीफायनला क्रिकेटप्रमींच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. आणि आता फायनल मॅचसाठी ही 'एका मिसळवर एक मिसळ फ्री' अशी योजना पुन्हा जाहीर केली आहे. जर सचिनने महाशतक केलं तर पुढचे तीन रविवार म्हणजे 10, 17 आणि 24 एप्रिलला एकावर एक मिसळ फ्री दिली जाणार आहे. पुण्यातील 'सत्यम' हॉटेलचे मालक अशोक जाधव यांनी ही योजना जाहीर केली आहे. भारत-पाक सामन्यात टीम इंडिया जिंकली तर त्यांच्या दुकानात एका मिसळवर एक मिसळ फ्री मिळणार' असं जाहीर करून टाकलं. आणि खादाड पुणेकरांनीही त्यांच्या या कल्पक योजनेला उत्तम प्रतिसाद दिला. एकाच दिवसात 'सत्यममध्ये' तब्बल 2000 मिसळ खपल्या आणि त्यावर जाहीर केल्याप्रमाणे आणखी 2000 फ्री मिसळही फस्त झाल्या. पुणेकरांच्या या प्रतिसादानंतर आता अशोक जाधव यांनी ही भन्नाट योजना जाहीर केली.

close