खास अंधांसाठीचा कॅरम बोर्ड तयार

November 8, 2008 4:48 PM0 commentsViews: 79

08 नोव्हेंबर पुणे,स्नेहल शास्त्रीअंधासाठी आजवर क्रिकेट आणि बुध्दिबळ स्पर्धा खेळवली जाते. त्याचप्रमाणे कॅरमच्याही स्पर्धा व्हाव्यात यासाठी आता खास अंधांसाठी कॅरम बोर्ड तयार करण्यात आला आहे. सोंगट्यांच्या रंगज्ञानासाठी त्यावर रिव्हर्स ब्रेल पद्धत वापरण्यात आली आहे. पांढ-या रंगाच्या सोंगटीवर लाल टिकली लावण्यात आलीय, तर स्ट्रायकरवर एक हुक लावण्यात आला आहे. ज्यामुळं सोंगट्यांना धक्का न लावता खेळता येईल. या मुलांना कॅरम खेळता यावा यासाठी वेगळी मेजरमेंट घेण्यात आली आहेत. खेळण्यासाठी त्याच्या वरच्या रेघा ठळक करण्यात आल्या आहेत. त्यासाठी एका साध्या पुठठ्यापासून टेम्पलेट्स तयार करण्यात आली आहेत. कॅरममुळे अंधांच ऐकण्याचं कौशल्य आणि क्षमता वाढून हालचालीही वाढतील, असं वैद्यकीय अधिका-यांचं मत आहे.

close