लंका बॅकफूटवर ; थरंगा, दिलशान माघारी

April 2, 2011 10:49 AM0 commentsViews: 4

02 एप्रिल

वर्ल्ड कपची फायनल मॅच अखेर वानखेडे स्टेडियमवर रंगत आहे. आणि भारतीय टीमनं भेदक बॉलिंग करत पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेला बॅकफूटवर ढकललंय. 17 ओव्हरमध्ये लंकेला केवळ 60 रन्सचा टप्पा पार करता आला आणि त्यांच्या दोन विकेट गेल्या आहेत. ओपनिंगला आलेल्या उपुल थरंगाला झहीर खाननं झटपट आऊट केलं. तर धोकादायक ठरणार्‍या तिलकरत्ने दिलशानला हरभजन सिंगने क्लिन बोल्ड केले. दिलशान 33 रन्सवर आऊट झाला. त्या पाठोपाठ कर्णधार कुमार संघकारा 48 रन्सवर आउट झाला. विशेष म्हणजे या मॅचमध्ये भारताच्या बॉलिंगबरोबरच फिल्डिंगही जबरदस्त होत आहे. लंकेच्या बॅट्सनना एकेक रन्स काढण्यासाठी झुंजावे लागतं आहे.

close