वर्ल्ड कप विजेते होण्यासाठी 275 रन्सचं टार्गेट

April 2, 2011 1:21 PM0 commentsViews: 4

02 एप्रिल

मुंबईच्या वानखेडे मैदानावर वर्ल्ड कपची मेगाफायनल सुरु आहे. आणि पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेनं विजयासाठी भारतासमोर 275 रन्सचं आव्हान ठेवलं आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये महेला जयवर्धने, कुलसेकरा आणि परेरानं फटकेबाजी करत लंकेला दमदार स्कोर उभा करुन दिला. महेला जयवर्धनेनं शानदार सेंच्युरी ठोकली. अवघ्या 88 बॉलमध्ये त्याने तब्बल 13 फोर मारत नॉटआउट 103 रन्स केले. तर थिसारा परेरा 22 रन्सवर नॉटआउट राहिला. भारतातर्फे झहीर खान आणि युवराज सिंगनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

लंकेची सुरूवात अडखळत झाली भारतीय टीमनं भेदक बॉलिंगचा सामना करत श्रीलंकन टीमने आता 40 व्या ओव्हरनंतर 180 रन्सचा टप्पा पार केला आहे पण पाच महत्त्वाच्या विकेट गमावल्या आहे. ओपनिंगला आलेल्या उपुल थरंगाला झहीर खाननं झटपट आऊट केलं. तर धोकादायक ठरणार्‍या तिलकरत्ने दिलशानला हरभजन सिंगनं क्लिन बोल्ड केलं. दिलशान 33 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर महेला जयवर्धने आणि संगकारा या आजी माजी कॅप्टनच्या जोडीने हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली खरी. पण हरभजनने संगकाराला आउट केलं आणि पव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर आलेल्या युवराज सिंगने आपल्या बॉलिंगवर थिलन समराविराला एलबीडब्लु आउट केलं. युवराज सिंगनं आता पर्यंत दोन विकेट घेतल्या आहे. लंकनं टीमची इंनिग सांभळण्यासाठी आलेल्या कपुगेटरा आणि कुलशेखरा हे क्रमाने आउट झाले. अखेर महेला जयवर्धनने 103 रन्सच्या शतकी खेळीवर भारतचाला 275 रन्सचं टार्गेट दिलं.

close