पेड न्यूजप्रकरणी चव्हाणांचा युक्तीवाद आयोगाने फेटाळला

April 2, 2011 2:14 PM0 commentsViews: 3

02 एप्रिल

आदर्श प्रकरणामुळे आधीच संकटात आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अजून एक धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांचा युक्तीवाद फेटाळत निवडणूक आयोगाने पेड न्यूज प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. हायकोर्टात या संबधीची याचिका प्रलंबित असल्यामुळे निवडणूक आयोगाला सुनावणी करण्याचा अधिकार नाही असा युक्तीवाद चव्हाण यांच्यावतीने आयोगाकडे करण्यात आला होता.

मात्र आयोगाने हा युक्तीवाद फेटाळून लावला. या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आयोगाचा आहे असं स्पष्ट करण्यात आलं. 2009 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान चव्हाण यांनी विविध मराठी आणि हिंदी वृतपत्रात जाहिराती दिल्या होत्या. मात्र त्याचा खर्च दाखवला नाही अशी तक्रार भोकर मतदारसंघातील पराभूत भाजप उमेदवार माधव किन्हाळकर आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

close