सीबीआयचे 9 जण 3 कंपनी विरोधात चार्जशीट दाखल

April 2, 2011 2:25 PM0 commentsViews: 3

02 एप्रिल

2 जी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज शनिवारी कोर्टात पहिलं चार्जशीट दाखल केलं. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात 80 हजार पानाचे चार्जशीट दाखल केले. 9 व्यक्ती आणि तीन कंपन्यांविरोधात हे चार्जशीट दाखल करण्यात आलंय. माजी दूरसंचार मंत्री ए. राजा, माजी दूरसंचार सचिव सिद्धार्थ बेहुरा, राजा यांचे माजी खासगी सचिव आर. के. चंडोलिया आणि स्वान टेलिकॉमचे प्रमोटर शाहीद बलवा यांची नाव चार्जशीटमध्ये आहेत. त्याशिवाय बलवा यांचे भागीदार विनोद गोएंका, युनिटेकचे संजय चंद्रा, अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे गौतम दोशी, हरी नायर यांची नावसुद्धा यात आहेत.

गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचे आरोप सीबीआयने ए. राजा यांच्यावर ठेवले आहे. 2 जी लायसन्स मिळवण्यासाठी रिलायन्स आणि स्वान टेलिकॉमने अधिकार्‍यांना लाच दिल्याचा आरोप ठेवण्यात आला. तर युनिटेक ही कंपनी लायसन्स मिळवण्यासाठी अपात्र होती, असं चार्जशीटमध्ये म्हटलंय. ए राजा यांच्या निर्णयामुळे 30 हजार 984 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. टाटा यांचं नाव चार्जशीटमध्ये नाही. कोर्टाने चार्जशीटमध्ये नाव असलेल्या सर्व आरोपींना 13 एप्रिल रोजी उपस्थीत राहण्याविषयी समन्स जारी केले आहेत. करुणानिधी यांच्या कलाईनार टीव्हीशी संबंधित दुसरे चार्जशीट या महिन्याच्या शेवटी दाखल केलं जाणार आहे.

close