जबाबदारी यंग ब्रिगेडवर

April 2, 2011 2:36 PM0 commentsViews: 3

02 एप्रिल

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कपची मेगाफायनल सुरु आहे. आणि पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेनं विजयासाठी भारतासमोर 275 रन्सचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 11 ओव्हरमध्ये 50 रन्सचा टप्पा पार केला आहे. सेहवाग शुन्यवर तर सचिन 18 रन्सवर झटपट आउट झाले. पण गंभीर आणि विराटने भारताची इनिंग सावरली आहे. दरम्यान अखेरच्या ओव्हरमध्ये महेला जयवर्धने, कुलसेकरा आणि परेराने फटकेबाजी करत लंकेला दमदार स्कोर उभा करुन दिला. महेला जयवर्धनेनं शानदार सेंच्युरी ठोकली. अवघ्या 88 बॉलमध्ये त्याने तब्बल 13 फोर मारत नॉटआऊट 103 रन्स केले. तर थिसारा परेरा 22 रन्सवर नॉटआऊट राहिला. भारतातर्फे झहीर खान आणि युवराज सिंगनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

close