युवराज ‘मॅन ऑफ द सीरिज’

April 2, 2011 6:44 PM0 commentsViews: 4

02 मार्च

गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोणीबरोबरच भारताच्या या विजयात युवराज सिंगनं मोलाचा वाटा उचलला. कॅप्टन धोणीबरोबर त्याने भारताला शानदार विजय मिळवून दिला. युवराज सिंगने नॉटआऊट 21 रन्स केले. पण या संपूर्ण स्पर्धेत युवराज भारतासाठी मॅचविनर ठरला आहे. बॅटिंगबरोबरच त्याने बॉलिंगमध्येही कमाल केली. बॅटिंगमध्ये त्याने 9 मॅचमध्ये 362 रन्स केले तर बॉलिंगमध्ये त्याने 15 विकेट घेतल्या.या स्पर्धेत तो तब्बल चार वेळा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. आणि त्याच्या याच कामगिरीमुळे मॅन ऑफ द सीरिजचा खिताबाचा मानकरीही युवराज सिंगच ठरला.

close