दिलेली ट्रॉफीच खरी आयसीसीचा दावा

April 4, 2011 9:20 AM0 commentsViews: 3

04 एप्रिल

आयसीसीने विश्वविजेत्या टीम इंडियाला दिलेल्या ट्रॉफीवरून आता वाद सुरू झाला आहे. ही ट्रॉफी खरी आहे की खर्‍या ट्रॉफीची प्रतिकृती आहे याचे गूढ कायम आहे. विजयानंतर टीमला दिलेली ट्रॉफी खरी नसून मूळ ट्रॉफीची प्रतिकृती असल्याची माहिती आहे. ट्रॉफी अजूनही एअरपोर्ट कस्टमच्याच ताब्यात असल्याचा दावा तिथल्या अधिकार्‍यांनी केला आहे. ट्रॉफीसाठी टॅक्स माफी द्यावी, असं पत्र आयसीसीनं लिहिलं होतं. पण कस्टमनं त्याला नकार दिला आहे. म्हणून कस्टम्सने वर्ल्ड कप ट्रॉफी आपल्याच ताब्यात ठेवली. पण टीम इंडियाला दिलेली ट्रॉफीच खरी असल्याचा दावा आयसीसीने केला. कस्टमच्या ताब्यात असलेली ट्रॉफी प्रमोशनसाठीची ट्रॉफी असल्याचे आयसीसीने स्पष्ट केलंय. ही ट्रॉफी पुन्हा दुबईला नेण्यात येणार आहे असही त्यांनी सांगितलं आहे.

close