नाशिकमध्ये उभारली तब्बल 121 फुटांची गुढी

April 4, 2011 9:48 AM0 commentsViews: 5

04 एप्रिल

नाशिकमध्ये शिवसेनेनं तब्बल 121 फुटांची गुढी उभारली. डोंगरी वस्तीगृहाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या या गुढीसाठी 5 फूटांचा खास तांब्याचा कलश तयार करून घेण्यात आला. 300 शिवसैनिकांनी मोठी कसरत करून ही गुढी उभारली आहे. पारंपरिक पध्दतीने या गुढीचे पूजन करण्यात आलंय. वर्ल्डकपच्या विजयामुळे ही 121 फुटांची विश्वविजयी गुढी उभारण्याचा विक्रम नाशिकच्या शिवसेनेनं केला.

close