झहीरचे होणार ‘दोनाचे चार हात’ !

April 4, 2011 12:21 PM0 commentsViews: 4

04 एप्रिल

टीम इंडियाने वर्ल्ड कप तर जिंकलाय आता टीम इंडियातील काही खेळाडूंचे दोनाचे चार हात करण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी तयारी केली आहे. युवराज आणि हरभजन सिंगनंतर आता झहीर खानच्या आईनंही झहीरच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. लग्न करावे यासाठी आपण झहीरच्या मागे कधीपासूनच लागलो होतो. पण वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच लग्न करेन असं झहीरनं सांगितलं होतं. आता त्याचे ते स्वप्नही पूर्ण झालंय त्यामुळे आता झहीरचे लग्न करणारच असही त्याच्या आईनं सांगितले आहे.

close