रत्नागिरीत शोभायात्रेत वर्ल्ड कपची प्रतिकृती

April 4, 2011 3:42 PM0 commentsViews: 2

04 एप्रिल

रत्नागिरीत आज गुडीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा निघाली. वर्ल्डकप जिंकल्याचे प्रतिबिंब या शोभायात्रेतही दिसलं. या शोभायात्रेत वर्ल्डकपच्या प्रतिकृतींचाही समावेश करण्यात आला होता. मांडवी मित्र मंडळाने 14 फुटी वर्ल्डकपची तयार केलेली प्रतिकृती सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी होती. तसेच पौराणिक देखाव्यांवर आधारीत चित्र रथही या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात भैरीदेवाच्या मंदिरातून निघालेल्या या शोभायात्रेचं आणि नवीन वर्षाचं जागोजागी स्वागत करण्यात आलं.

close