वर्धा येथे शेकडो पोती गहू सडला

April 5, 2011 10:43 AM0 commentsViews: 6

05 एप्रिल

वर्धा जिल्ह्यातील एफसीआय गोडावूनमध्ये जागा नसल्याने गेल्या 6 महिन्यांपासून शेकडो क्विंटल गहू उघड्यावर पडला. त्यामुळे शेकडो पोती गहू पूर्णपणे सडला आहे. वर्ध्यात 50 हजार मेट्रिक टन धान्य साठवण्याची क्षमता असलेले 22 गोडावून आहेत. पण त्यात साठवणूकीला जागाच शिल्लक नसल्याने गव्हाची पोती उघड्यावर टाकण्यात आली आहे. पण शेकडो क्विंटल गव्हाची नासाडी होत असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केलं. दरम्यान, विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि आमदार सुरेश देशमुख यांनी या बातमीची दखल घेतली आहे.

close