टाळमृदुंगाच्या गजरात पंढरपुरात कार्तिकी एकादशी साजरी

November 9, 2008 5:32 AM0 commentsViews: 96

9 नोव्हेंबर, पंढरपूरकार्तिकी एकादशीनिमित्त वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी पंढरपुरात सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. पहाटे अडीच वाजता ही पूजा करण्यात आली. यावेळी वारकर्‍यांचे प्रतिनीधी म्हणून पूजेला बसण्याचा मान जळगाव जिल्ह्यातल्या वाघोळा गावातल्या हरीभाऊ तुकाराम कोळी आणि त्यांच्या पत्नीला मिळाला. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी तीन लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झालेत. दर्शन रांगेत एक लाखांपेक्षा जास्त भाविक उभे आहेत. दर्शनासाठी पंधरा तासांचा अवधी लागतोय. पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरी नगरी भक्तीरसात न्हावून निघाली आहे. चंद्रभागेचं वाळवंट मठ, मंदिरे, धर्मशाळा या ठिकाणी टाळमुंदुगाचा गजर, ज्ञानबा तुकारामाचा जयघोष सुरू आहे.

close