सचिनला भारतरत्न देण्याची शिफारस करणार – मुख्यमंत्री

April 5, 2011 9:33 AM0 commentsViews: 1

05 एप्रिल

भारताने वर्ल्ड कप जिंकून 28 वर्षानंतर इतिहास घडवला. या ऐतहासिक विजयानंतर टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव झाला. तर आज मंगळवारी विधानसभेत टीम इंडियाच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच सचिनला भारतरत्न देण्याची शिफारस राज्य सरकार केंद्राकडे करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

सचिन तेंडुलकरला वाढीव एफएसआय देण्याची मागणी मनसे आणि शिवसेनेच्या गटनेत्यांनी विधानसभेत केली. सचिनने जिमसाठी वाढीव एफएसआयची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने मागणी मान्य केली नव्हती. सचिनचा वाढीय एफएसआय मान्य करावा अशी जोरदार मागणी मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी केली.

close