स्पेक्ट्रम प्रकरणी अनिल अंबानींची चौकशी

April 5, 2011 11:08 AM0 commentsViews: 4

05 एप्रिल

नीरा राडिया आणि रतन टाटानंतर 2-जी घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानींचीही आज लोकलेखा समिती चौकशी करत आहे. त्यासाठी अनिल अंबानी संसदीय लोकलेखा समितीपुढे हजर झाले आहेत. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी समितीपुढे त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. सीबीआयने 2-जी घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनिल अंबानी यांचंही नाव आहे.

त्याचबरोबर स्वॅन टेलीकॉमचे प्रमोटर्स विनोद गोएंका आणि युनिटेकचे महासंचालक संजय चंद्र यांची चौकशी केली जाणार आहे. याच प्रकरणी काल रतन टाटा आणि कॉर्पोरेस्ट लॉबिस्ट नीरा राडिया यांची चौकशी झाली. चौकशी दरम्यान राडिया यांनी संदिग्ध उत्तर दिल्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी सांगितलंय. तर मीडियात प्रसिद्ध झालेल्या टेप्समध्ये फेरफार झाल्याचा दावा राडिया यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

close