जे जे हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांचा आंदोलनचा पवित्रा

April 5, 2011 11:25 AM0 commentsViews: 5

05 एप्रिल

मुबंईतील जे जे हॉस्पिटलमध्ये सध्या काम करत असलेल्या कामगारांना काढून तिथे कंत्राटी पद्धतीने कामगारांची नेमणूक करण्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कामगारांच्या मागण्या पूर्ण न करता शासनाने त्यांच्यावर आणखी अन्याय केला. त्याच्या विरोधात सात एप्रिलला तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कामगार मंत्रालयावर आपल्या कुटुंबीयासह मोर्चा काढणार आहेत.

close