‘खिलाडी’ परत आला

April 5, 2011 11:34 AM0 commentsViews: 3

05 एप्रिल

अक्षय कुमार खतरों के खिलाडी सिझन 4मध्ये पुन्हा एकदा होस्ट म्हणून दिसणार आहे. या आधी अक्षयने दोन सिझन होस्ट केले होते. तसेच सलमान खान यावेळेस या शोचा होस्ट असणार अशी चर्चाही झाली होती. खिलाडी अक्की पुन्हा एकदा या रिऍलिटी शोच्या या नव्या प्रोमोज्‌मध्ये लवकरचं आपल्या दिसणार आहे. सिझन तीनमध्ये प्रियांका चोप्रा होस्ट होती यासाठी या शोचं स्वरूप ही बद्दलण्यात आलं होतं. सिझन 4 चं शूटिंग साउथ आफ्रिकेत होणार असून या वेळेस 13 सेलिब्रिटी खिलाडी आणि त्यांच्या 13 जोडीदार स्टंट्स करताना दिसतील. खतरों के खिलाडी सिझन 4 हा शो मे महिन्यात सुरू होईल.

close