गझलनवाझ भीमराव पांचाळे यांचा सत्कार

April 5, 2011 12:05 PM0 commentsViews: 5

05 एप्रिल

मराठी गझलला सामान्य रसिकांपर्यंत पोहचवणारे गझलनवाझ भीमराव पांचाळे यांचा षष्ट्यब्दपूर्ती सोहळा काल मुंबईत दिमाखात पार पडला. केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पांचाळे यांचा सत्कार केला. पांचाळे यांच्या गझलांचा गेल्या चाळीस वर्षांचा मागोवाच यानिमित्ताने घेतला गेला. हा सोहळा विदर्भ लोकप्रतिष्ठान या मुंबईकर वैदर्भियांच्या संघटनेने आयोजित केला होता. गजलनवाझ एक प्रवास ही गौरविका यावेळी प्रकाशित करण्यात आली.

close