अण्णांच्या आंदोलनात तरुणांचा सहभाग

April 5, 2011 4:22 PM0 commentsViews: 12

05 एप्रिल

लोकपाल विधेयकासाठी संयुक्त समिती स्थापन करावी या मागणीसाठी अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनाला सगळ्यात मोठी ताकद मिळालीय ती तरुणांच्या सहभागामुळे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात निघालेल्या मोर्चांमध्ये अनेक तरुणांनी भाग घेतला. आता तर या आंदोलनाचं नेतृत्वही तरुणांच्या हातात देण्याची योजना असल्याचे आंदोलनाच्या आयोजकांनी सांगितलंय. पुण्यातही या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला आहे. तिथं सह्यांची मोहीम आधीच सुरू करण्यात आली होती. आता या सह्यांचे निवेदन दिल्लीला पाठवलं जाणार आहे. इजिप्तमध्ये झालेल्या क्रांतीनंतर आंदोलनातून भ्रष्ट व्यवस्था बदलता येते हे सिद्ध झालंय असा विश्वासही अनेक तरुणांनी व्यक्त केला.

close