शुंगलू समितीच्या अहवालात कलमाडी आणि जयपाल रेड्डींवर ठेवला ठपका

April 5, 2011 5:44 PM0 commentsViews: 2

05 एप्रिल

कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी करणार्‍या शुंगलू समितीने आपला सहावा आणि अंतिम अहवाल तयार केला. त्यात आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना ढिसाळ नियोजनाबद्दल जबाबदार धरण्यात आलंय. पण त्याचबरोबर माजी नगरविकास मंत्री जयपाल रेड्डी आणि आयोजन समितीचे सीईओ जर्नेल सिंग यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. रेड्डी यांनी कॉमनवेल्थसाठी डोळे झाकून अतिरिक्त रक्कम मंजूर केल्याचे अहवालात म्हटलं आहे. दिलेल्या रकमेपैकी 3 हजार 188 कोटी रुपये वापरले गेले नव्हते, तरीही कलमाडी यांनी आणखी 900 कोटींची मागणी केल्याचे त्यात म्हटलंय.

अंतिम अहवालमध्ये

- मंत्रिगटाची परवानगी न घेताच विझक्रॉफ्ट या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं- कॉमनवेल्थचे संयुक्त महासंचालक संजय मोहिंद्रू यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह – कलमाडी आणि सरकारनं नियुक्त केलेले अधिकारी यांच्यात संवादाचा अभाव होता- संवादाच्या अभावामुळे नियोजनात ढिसाळपणा वाढला- आयोजन समितीवर कलमाडी यांच्या कंपूनं वर्चस्व गाजवलं

close