उपोषण मागे घेणार नाही !

April 6, 2011 9:34 AM0 commentsViews: 5

06 एप्रिल

अण्णांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आजही अण्णा आणि केंद्र सरकार आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण असं असलं तरी दोन्ही बाजूंनी एकेक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनावर काही तोडगा निघेल, असं दिसतंय.

अण्णांच्या आंदोलदाना दोन दिवस उलटले. पण तरीही तोडगा मात्र निघाला नाही. भ्रष्टाचार विरोधी लोकपाल विधेयकाचा मसुदा अण्णांचे सहकारी असलेल्या संयुक्त समितीनं बनवावा या मागणीवर अण्णा ठाम आहेत. तर ही मागणी मान्य करायला अजूनही केंद्र सरकार तयार नाही. हा गतीरोध कायम असला तरी दोन्ही बाजूंनी सामंजस्याच्या दिशेनं थोडेबहुत प्रयत्न होताना दिसले. कायदामंत्री वीरप्पा मोईली म्हणाले की आम्ही बिलाच्या मसुद्यात बदल करायला तयार आहोत.

तर दुसरीकडे अण्णांच्या बाजूनेही केंद्र सरकारला काहीसा मवाळ संदेश देण्यात आला. अण्णांच्यावतीने चर्चा करणारे स्वामी अग्निवेश म्हणाले की मंत्रिगटातील सदस्य अण्णांचे सहकारी आणि राष्ट्रीय सल्लागार समितीतले नॅकमधील काही सदस्य या सर्वांची मिळून संयुक्त समिती बनवली तर असा मधला मार्ग आम्हाला मान्य आहे. पण दोन्ही बाजूंनी होत असलेले हे प्रयत्न अपूरे आहेत. आणि दुसर्‍या दिवसाअखेरही दोन्ही गटांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही.

सोशल नेटवर्किंगव्दारे पाठिंबा

इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून हजारो तरुण या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी अण्णांची तब्येत स्थिर आहे. पण त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. लोकपाल विधेयकातील बदलासाठी संयुक्त समिती स्थापन करावी या मागणीसाठी अण्णा हजारेंचं आंदोलन सुरु आहे.

close