सेलिब्रिटीही अण्णांच्या पाठीशी !

April 6, 2011 9:09 AM0 commentsViews:

06 एप्रिल

अण्णा हजारे यांच्या आंदोलनला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. तर सोशल नेटवर्किंग जगात ही अण्णा पाठिंबा दिला जात आहे. अण्णांच्या आंदोलनला सेलिब्रिटीनी ट्विटरवरून आपला पाठिंबा दिला आहे.

अनुपम खेर म्हणतात की, 'भ्रष्टाचाराविरुध लढत असलेल्या अण्णांचा माझा पाठिंबा आहे. त्यांच्या हेतूचं मी कौतूक करतो. अण्णांना पाठबळ देण्याची गरज आहे.'

प्रितीश नंदी- यांनीही याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. सर्व स्तरातून अण्णा हजारेंना मिळत असलेल्या पाठिंब्याचा मला अभिमान आहे. वयाच्या 72व्या वर्षीही लढत असेल्या अण्णांना सगळ्यांच्या समर्थनाची गरज आहे.

तर बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा म्हणते, मी अण्णा हजारेंची समर्थक आहे. त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे आणि लोकपाल विधेयकाला माझा पाठिंबा आहे. असंही तिनं म्हटलं आहेत.

तर चित्रपट निर्माता मधूर भांडाकर म्हणतात की, भ्रष्ट राजकारण्यांविरोधात असणार्‍या प्रत्येक भारतीयाचा आवाज म्हणजे अण्णा हजारे.

चेतन भगत म्हणतात, 'लोकपाल विधेयक हा नवा भ्रष्टाचार विरोधी विधेयक आहे. हे विधेयक संमत होणं म्हणजे दुसर्‍यांदा स्वातंत्र्य मिळवण्याबरोबर आहे. अण्णांना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे.

close