पुणे वॉरिअर्सची मराठमोळी रॅली

April 6, 2011 12:07 PM0 commentsViews:

06 एप्रिल

क्रिकेट वर्ल्ड कपच्या पाठोपाठ सहा दिवसातच आयपीएल सुरु होत असल्यामुळे टीम्सना यावेळी प्रमोशनसाठी वेळ मिळालेला नाही. शिवाय महत्त्वाचे खेळाडूही वर्ल्ड कपमध्ये व्यस्त होते. पण आता फायनल संपल्या संपल्या जगभरातील अव्वल खेळाडू पुन्हा एकत्र आलेत ते आयपीएलसाठी. पुणेकरांसाठीही यंदाचे आयपीएल खास आहे.

कारण सहारा पुणे वॉरिअर्स ही त्यांची हक्काची टीम या आयपीएलमध्ये खेळणार आहे. पुण्यातही त्यामुळे आता आयपीएलचं वातावरण तयार होतंय. त्यानिमित्ताने आज पुण्यात एक रॅलीही काढण्यात आली. विमान नगर परिसरात ही रॅली काढण्यात आली. रॅलीतील वातावरण अर्थातच मराठमोळं होतं. ढोल ताशांचा गजर होता. तसेच पुणे टीमचा लोगोही पहिल्यांदा लोकांसमोर आला.

close