मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी राहुल शेवाळेंची निवड

April 6, 2011 10:14 AM0 commentsViews: 2

06 एप्रिल

मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या अखेर शिवसेनेच्याच हाती गेल्या. अपेक्षेप्रमाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांची निवड झाली. तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे विनोद घेडिया यांची निवड झाली. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीसाठी आज मतदान झालं. यामध्ये राहुल शेवाळे यांना 14 तर राष्ट्रवादीच्या नियाज वनू यांना 11 मतं मिळाली. दरम्यान अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका वंदना गवळी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने 3 कोटी रुपये लाच देऊन फोडण्याचा प्रयत्न केला. यामागे राष्ट्रवादीच्या एका मोठ्या मंत्र्याचा हात असल्याचा आरोपही राहुल शेवाळे यांनी केला.

close