आदरतिथ्याची आफ्रिदी जाणीव नाही – हरभजन

April 6, 2011 12:27 PM0 commentsViews: 3

06 एप्रिल

पाकिस्तानी कॅप्टन शाहिद आफ्रिदीने भारत आणि भारतीय मीडियाबद्दल केलेलं विधान मागे जरी घेतलं असलं तरी भारताचा प्रमुख बॉलर हरभजन सिंगने अजून त्याला पुरतं माफ केलेलं नाही. भारतीय जनतेने आफ्रिदी आणि त्याच्या टीमचं स्वागत केलं आदरातिथ्य केलं. त्याची जाणीवआफ्रिदीने केली नाही असं हरभजन सिंग म्हणाला आहे. भारतीय लोक मोठया मनाचे नसते तर त्यांनी एवढी प्रगती केलीच नसती आफ्रिदीने अशाप्रकारचे विधान करायला नको होतं. त्यामुळे सध्या जो मान त्याला भारतात मिळतोय तो ही मिळेनासा होईल असंही हरभजन म्हणाला.

close