‘सोशल नेटवर्किंगव्दारे’ उपोषणात सामिल व्हा !

April 6, 2011 10:54 AM0 commentsViews: 3

06 एप्रिललोकपाल विधेयक पास होण्यासाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा दिला जात आहे. यामध्ये सोशल नेटवर्किंगच्या सहाय्याने आपण ही या आंदोलनात सामिल होऊ शकता. आणि त्या साठी सगळी माहिती तुम्ही इंटरनेट वरुन मिळवू शकता.तुमच्या फेसबूक अकाऊंट वर जर तुम्हाला ' Support for anna Hazare' असं नोटीफिकेशन आलं तर ते इग्नोर करु नका. त्या वर क्लिक करा. तुमच्या पुढे india against corruption हे वेबपेज ओपन होईल. तसेच तुम्ही twitter.com/janlokpal या ट्विटर अकाऊंटच्या सहाय्याने ही या आंदोलनात सामिल होवू शकता.

तसेच त्यांच्या अधिकृत वेबसाईट www.annahazare.org वर तुम्हाला lokapal vidheyak सगळी माहिती तर मिळतेच पण त्याच सोबत तुम्हाला या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी पंतप्रधानांना पत्र लिहायचं असेल. तर तुम्ही english आणि hindi मध्ये हे पत्र पाठवू शकता.

अण्णा हजारेंनी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र ही वाचू शकता. आणि जर अण्णांच्या उपोषणात तुम्हाला ही सामिल व्हायचं असेल तर. त्यासाठी तुम्ही दिल्लीलाच असलं पाहिजे हे गरजेचं नाही. तर या वेबसाईट वरुन तुम्हाला माहिती मिळू शकते की तुमच्या शहरात किंवा गावात कुठे आणि कोण उपोषणाला बसलं आहे. या वेबसाईटच्या मते आत्ता पर्यंत 5 लाख 70 हजार लोकं उपोषणाला बसले आहेत.

गांधीजीच्या काळात बापू उपोषणाला बसलेत हे जेव्हा समजेल तेव्हा इतर लोक देशाच्या काना कोपर्‍यात उपोषणाला बसायचे. पण आता इंटरनेटच्या एका क्लिक वर लोकांना अण्णाच्या उपोषणाची बातमी सहज मिळू शकते आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या या आंदोलनाला वेग मिळू शकतो.

close